प्रतिनिधी/नागठाणे
महात्मा फुले कृषि विद्यापीठाअंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव (ता.सातारा) येथे नुकतेच भाजीपाला निर्जलीकरण केंद्राचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समनव्यक प्रा.मोहन शिर्के होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन आत्माचे प्रकल्प संचालक अशोक देसाई व उपसंचालक उत्तम देसाई हे उपस्थित होते.
या निर्जलीकरण केंद्राचा शेतकरी व युवा शेतकरी उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग करावा असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी केले. यावेळी डॉ. कल्याण बाबर, विषय विशेषज्ञ, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान यांनी आवळा कँडीचे प्रात्यक्षिक करुन दाखविले तसेच निर्जलीकरण उपकरणाची माहिती उपस्थितांना दिली. या निर्जलीकरण केंद्रासाठी आर्थिक सहाय्य आत्मा, सातारा यांच्या संशोधनात्मक उपक्रमाच्या आर्थिक वर्षातील निधीतुन आलेले आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सागर सकटे, विषय विशेषज्ञ, पशुविज्ञान व दुग्धशास्त्र यांनी केले. उद्यानविभागाचे विशेष विषयातज्ञ भुषण यादगीरवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमावेळी कोव्हीड विषाणु महामारीच्या संदर्भातील सर्व आवश्यक त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते. या कार्यक्रमास विषय विशेषज्ञ डॉ. महेश बाबर, डॉ. स्वाती गुर्वे, संग्राम पाटील, कार्यक्रम सहाय्यक आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.