बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोनाची गती भयानक वेगाने वाढली आहे. गेल्या १२ दिवसांत राज्यात एक लाखाहून अधिक नवीन लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी ३८ टक्के रुग्ण राजधानी बेंगळूर मधील आहेत.
१८ सप्टेंबर रोजी राज्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५,०२९८२ होती तर ३० सप्टेंबरला ही संख्या ६,०१७६७ वर पोचली आहे. या काळात राज्यात एक हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत.१८ सप्टेंबरला कोरोना संक्रमित मृतांची संख्या ७,८०८ होती, तर ३० सप्टेंबरला मृतांची संख्या ८ ८६४ वर पोचली आहे. राज्यात प्रथमच १२ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या एक लाखावर पोहचली आहे. दरम्यान सध्या राज्यात एक लाखाहून अधिक कोरोना सक्रिय प्रकरणे आहेत.









