वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वर्षाच्या प्रारंभी पेट्रोलच्या किंमतीने उच्चांक प्राप्त केल्यानंतर भारतात डिझेलचे भाव हळूहळू कमीकमी होत गेले आहेत. डिझेलच्या किमतीमधील कपातीचा आज सलग चौथा दिवस आहे. यामध्ये डिझेलचे भाव 8 पैशानी कमी झाले आहेत. दुसरीकडे पेट्रोलचे भाव मागील सात दिवसांपासून स्थिर आहेत.
वाढत जाणाऱया कोरोनाच्या प्रभावात कच्च्या तेलाची मागणी घटली आहे. या अगोदर लॉकडाऊनच्या काळात जेव्हा कच्च्या तेलाची किमत घटली होती. तेव्हा ऑईल कंपन्यांनी कर आकारणीचा आधार घेत जोरदार नफा कमाई केली आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोलचे दर घसरत गेले आहेत. या अगोदर ऑगस्ट आणि जुलैमध्ये पेट्रोलच्या किमती वाढत राहिल्या होत्या. डिझेलचे भाव हे सर्वाधिक राहिले होते. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे जगभरातून होणारी कच्च्या तेलाची मागणी घसरत गेल्याची नोंद करण्यात आली आहे.
चालू वित्त वर्षात पहिल्या तिमाहीत आर्थिक स्थिती बिकट राहिली आहे. परंतु तेल कंपन्यांनी समान तिमाहीत चांगल्या प्रकारची नफा कमाई केली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला चालू वित्त वर्षातील पहिल्या तिमाहीतील नफा कमाई ही मागील वर्षाच्या तुलनेत अधिक राहिली आहे. आयओसीएलने वित्त वर्ष 20 च्या 1313 कोटीच्या तुलनेत चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 1911 कोटींचा नफा कमाई केली आहे. यासोबत एचपीसीएलने 2637 च्या तुलनेत 2814 कोटींची नफा कमाई केली आहे.