प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षणावरील स्थगितीबाबत न्यायिक पातळीवरील भूमिका ठरविण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे रविवारी (दि.4) कोल्हापूरातील लोणार वसाहत येथील महाराजा बँक्वेट हॉल येथे न्यायिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. यासाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील वकिल प्रतिनिधी व मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती समन्वयक प्रा. दिलीप पाटील व दिलीप देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ही परिषद सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळत आहे. यासाठी 200 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगसह इतर खबरदारी घेतली जाणार आहे. या परिषदेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. आशिष गायकवाड यांची उपस्थिती राहणार आहे.
या परिषदेमध्ये मराठा आरक्षणाचा फेरविचार काळाच्या ओघात, आरक्षणासाठी अनन्य साधारण व अपवादात्मक परिस्थिती, सन 2020 मध्ये विशेषत: कोरोना काळातील टाळेबंदी सुरु असताना सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू व हरियाणामधील राजकीयदृष्टÎा प्रबळ असलेल्या जाट समाजाला आरक्षण देणारा कायदा याबद्दल काय भूमिका घेतली, 50 टक्के ही आरक्षणाची मर्यादाच कालबाह्य ठरविण्यासाठी सर्वेच्च न्यायालयात लढा द्यावा का व तो कसा द्यावा, सर्वसामान्य व तळागालातील मराठÎांना मराठा आरक्षण, त्यातील बारकावे, त्यावरील मार्ग व आरक्षणापासूनचे फायदे याची संपूर्ण माहिती या बाबींवर ऊहापोह होणार आहे. यावेळी ऍड. विवेक घाटगे, जयेश कदम, ऍड. बाबा इंदूलकर, राजीव लिंग्रस आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









