पुलाची शिरोली / वार्ताहर
शिरोली गावात ग्रामीण रुग्णालय तसे प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत उपकेंद्र मंजूर व्हावे. अशी मागणी शिरोली ग्रामपंचायतीने आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचेकडे केली आहे.
शिरोली औद्योगिक वसाहतीमुळे गावाचा प्रचंड विस्तार झाला आहे. नवीन उपनगरे निर्माण झाली आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्रात येण्यासाठी रुग्णांची ससेहोलपट होत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय व माळवाडी ( राजर्षी छत्रपती शाहू नगर) व यादववाडी या दोन भागात आरोग्य उपकेंद्र सुरू करावे. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आह . या मागणीचे निवेदन राजेंद्र पाटील-यड्रावकर (आरोग्य राज्यमंत्री ) यांना सरपंच शशिकांत खवरे ,उपसरपंच सुरेश यादव ,ग्राम विकास अधिकारी ए. एस. कठारे, महेश चव्हाण , ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे, सलीम महात बाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









