प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील नरबे येथे चक्कर येवून पडलेल्या तरूणाची दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आह़े मंदार रमाकांत देसाई (27, ऱा गावठणवाडी, ओरी त़ा रत्नागिरी) यांनी याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली आह़े पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरूद्ध गुन्हा दाखल केला आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंदार देसाई हे 23 सप्टेंबर रोजी आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच 08 एमए 5111) घेवून ओरी ते निवळी असे जात हात़े दरम्यान नरबे येथे चक्कर आल्याने दुचाकी बाजूला ठेवून ते रस्त्याकडेला पडले होत़े याचा फायदा उठवत अज्ञात चोरटय़ाने देसाई यांची दुचाकी चोरून नेल़ी याप्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आह़े









