प्रतिनिधी/ मडगाव
महिला व बाल कल्याण खात्याच्या संचालिका दिपाली नाईक यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांना मडगावच्या ईएसआय कोविड हॉस्पिटलात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी स्वताच ही माहिती फेसबुकच्या माध्यमांतून दिली आहे.
दिपाली नाईक यांना शनिवारी कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्या घरातच विलगीकरणात होत्या. त्यानंतर सोमवारी त्यांना नव्या जिल्हा कोविड हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत विशेष सुधारणा होत नसल्याने काल मंगळवारी त्यांना ईएसआय कोविड हॉस्पिटलात स्थलांतरीत करण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.