प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने 25 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 548 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 33 हजार 297 झाली आहे. पॉझिटिव्ह रूग्णसंख्या घटली आहे. मंगळवारी 205 नवे रूग्ण दिसून आले. पॉझिटीव्ह रूग्णसंख्या 43 हजार 982 झाली आहे. ती 44 हजारांच्या उंबरठ्यावर आहे. कोरोना बळींची संख्या 1423 झाली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी सीपीआरसह अन्य केअर सेंटरमध्ये 1 हजार 7 जणांची तपासणी केली. सध्या 9 हजार 262 रूग्ण उपचार घेत आहेत. सायंकाळपर्यत शेंडा पार्क येथील लॅबमधून 894 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 753 निगेटिव्ह तर 141 पॉझिटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 341 रिपोर्ट आले. त्यापैकी 44 पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने 25 जणांचा मृत्यू झाला. सीपीआर हॉस्पिटलमध्ये आजरा येथील 65 वर्षीय पुरूष, इचलकरंजी येथील 64 वर्षीय महिला, वाठार हातकणंगले येथील 75 वर्षीय पुरूष, माणगाव हातकणंगले येथील 63 वर्षीय पुरूष, बोरगाव निपाणी बेळगाव येथील 63 वर्षीय पुरूष, गोरंबे कागल येथील 64 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.
इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये रूई हातकणंगले येथील 72 वर्षीय महिला आणि विकासनगर इचलकरंजी येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील अन्य हॉस्पिटल, केअर सेंटरमध्ये हणबरवाडी करवीर येथील 60 वर्षीय पुरूष, गारीवडे गगनबावडा येथील 60 वर्षीय पुरूष, मुक्तसैनिक वसाहत कोल्हापूर येथील 69 वर्षीय महिला, विरळे शाहूवाडी येथील 65 वर्षैय पुरूष, आसुर्ले मानेवाडी पन्हाळा येथील 40 वर्षीय पुरूष, सदलगा बेळगाव येथील 77 वर्षीय पुरूष, कराड सातारा येथील 65 वर्षीय पुरूष, गणेशवाडी शिरोळ येथील 80 वर्षीय महिला, विचारे माळ कोल्हापूर येथील 69 वर्षीय महिला, जरगनगर कोल्हापूर येथील 55 वर्षीय पुरूष, पडळ पन्हाळा येथील 61 वर्षीय पुरूष, देवगड सिंधुदुर्ग येथील 70 वर्षीय पुरूष, नाटोली शिराळा सांगली येथील 82 वर्षीय पुरूष, कोडोली पन्हाळा येथील 65 वर्षीय पुरूष, बिद्री कागल येथील 72 वर्षीय पुरूष, सैनिक टाकळी शिरोळ येथील 42 वर्षीय पुरूष, आणि मिठबाव देवगड सिंधुदुर्ग येथील 81 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात कोरोनाने आजपर्यत 1 हजार 423 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ग्रामीण भागात 679, नगरपालिका क्षेत्रात 312, महापालिका क्षेत्रात 332 तर अन्य 100 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 548 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 33 हजार 297 झाली आहे. शहरात 46 नवे रूग्ण दिसून आल्याने पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 13 हजार 374 झाली आहे. आजरा 3, भुदरगड 17, चंदगड 15, गडहिंग्लज 4, हातकणंगले 28, करवीर 27, पन्हाळा 3, राधानगरी 2, शाहूवाडी 16, शिरोळ 12 नगरपालिका क्षेत्रात 29, कोल्हापूर शहर 46 आणि अन्य 3 असे 205 रूग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









