- कोरोना सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 97
- 24 तासात आणखी सहा रुग्णांचा मृत्यू
प्रतिनिधी / ओरोस:
कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असले, तरी दरदिवशी नवीन रुग्णांची संख्या ही वाढताना दिसत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंतच्या मागील 24 तासात जिल्हय़ात नव्याने 77 रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकूण सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नव्याने आढळलेल्या 77 पॉझिटिव्ह रुग्णांसह सद्यस्थितीत जिल्हय़ात 1 हजार 97 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाची साखळी सुरू झाल्यापासून पॉझिटिव्ह आलेल्या नमुन्यांची संख्या 3550 वर पोहोचली आहे. पैकी 2 हजार 376 रुग्ण कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतले आहेत. आतापर्यंत 77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्णांना प्रतिदिन 150 ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासते. भविष्यात ऑक्सिजनच्या तुटवडय़ामुळे रुग्ण दगावू नये, यासाठी ऑक्सिजन प्लान्ट जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 24618
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 3550
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 20913
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 158
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 1097
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 77
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 2376
गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 4869
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12937









