बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर शहरी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ४ हजाराहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. शुक्रवारी राज्यात कोरोनाची एकूण ८,६५५ नवीन प्रकरणे नोंदली गेली. यापैकी ४,०८० रुग्ण बेंगळूर शहरी जिल्यात सापडले आहेत. दरम्यान गुरुवारी बेंगळूर शहरात ४,१९२ कोरोना रुग्ण आढळले.
आरोग्य विभागाने जारी केल्या बुलेटीननुसार बेंगळूरमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या २,१२,५४७ वर पोहोचली आहे. यापैकी १,६७,९३६ रूग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर ४१,८१६ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत २,७९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.