Close Menu
Tarun Bharat
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    Trending
    • Testing
    • Test 5 Dec
    • Test Post 12-11
    • Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
    • उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
    • Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
    • Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
    • आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram
    Tarun Bharat
    दिवाळी मासिक थेट तुमच्या घरी! YEARLY NEWSPAPER SUBSCRIPTION E-paper
    • होम
    • महाराष्ट्र
      • मुंबई /पुणे
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सातारा
      • सोलापूर
      • कोकण
      • इतर
    • कर्नाटक
      • बेंगळूर
      • बेळगांव
      • हुबळी / धारवाड
      • कारवार
      • विजापूर
    • गोवा
    • भविष्य
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • क्रीडा
    • संपादकीय
    • व्यापार / उद्योगधंदे
    • मनोरंजन
    • इतर
      • टेक / गॅजेट
      • फूड
      • ऑटोमोबाईल
      • विविधा
      • संवाद
      • कृषी
      • व्यंगचित्रे
      • फॅशन
      • विनोद
      • अस्मिता
      • नोकरी / करियर
      • टुरिझम
      • आरोग्य
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram
    दिवाळी मासिक थेट तुमच्या घरी!
    Tarun Bharat
    कर्नाटक

    एनआयएचे बेंगळुरात 30 ठिकाणी छापे

    Tarun Bharat PortalBy Tarun Bharat PortalSeptember 25, 20202 Mins Read

    फरार सुत्रधाराला अटक : कारवाईवेळी शस्त्रास्त्र, कागदपत्रे जप्त

    प्रतिनिधी/ बेंगळूर

    बेंगळूरच्या डी. जे. हळ्ळी आणि के. जे. हळ्ळी येथील हिंसाचाराचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) हाती घेतला असून बुधवारी बेंगळूरमधील 30 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. छाप्यादरम्यान हिंसाचाराचे षड्यंत्र रचल्याप्रकरणी फरार असणाऱया एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली. सादिक अली असे त्याचे नाव आहे. तोच या प्रकरणाचा सुत्रधार असल्याचे समजते. छाप्यावेळी एअरगन, काडतुसे, धारदार शस्त्रs, लोखंडी रॉड, डिजिटल उपकरणे, डिव्हीआर वादग्रस्त संघटनांशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

    दोन दिवसांपूर्वीच एनआयएने हिंसाचार प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. बेंगळूरच्या सीसीबी पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एनआयएच्या अधिकाऱयांनी शहरात विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून महत्त्वाची माहिती जमा केली. हिंसाचार घडवून आणण्यास कारणीभूत असणारे आणि षडय्dांत्र रचणाऱयांच्या निवासस्थानांवर व इतर ठिकाणी छापे टाकण्यात आले. कारवाईदरम्यान, 11 ऑगस्टच्या रात्रीपासून फरार असणाऱया सादिक अली याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. सादिक हा बँकेत कर्जवसुली एजंट म्हणून काम करतो. हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी तो एक आहे.

    हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेला एसडीपीआय संघटनेचा नेता सय्यद मुजम्मिल, काँग्रेस नेता कलीम पाशा, पुलकेशीनगरचे निजद अध्यक्ष वाजिद पाशा, बेंगळूरचे माजी महापौर संपतराज यांचा साहाय्यक अरुण, दशहतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा आरोप असणारा समिऊद्दिन आणि फिरोज पाशा यांची निवासस्थाने व कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत.

    काँग्रेस आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांचा भाचा नवीन याने सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टनंतर बेंगळूरच्या डी. जे. हळ्ळी व के. जे. हळ्ळी येथे हिंसाचार झाला होता. 10 ऑगस्ट रोजी समाजकंटकांनी आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांचे निवासस्थान, पोलीस स्थानक, पोलीस वाहने, सार्वजनिक मालमत्ता व खासगी मालमत्तांची हानी केली होती. जाळपोळ, दगडफेकीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती.   

    #tarunbharat_official #tarunbharatnews
    Previous Articleगलवान खोऱ्यात मारले गेलेल्या सैन्यांची चीनकडून कबुली
    Next Article कृषी विधेयकाची जिल्ह्यात विविध ठिकाणी होळी
    Tarun Bharat Portal

    Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.

    Related Posts

    Priest lynched to death with stone in Bijapur
    कर्नाटक

    विजापुरात पुजाऱ्याची दगडाने ठेचून हत्या

    November 11, 2025
    High-powered Committee for Prisons
    कर्नाटक

    कारागृहांसाठी उच्चाधिकार समिती

    November 11, 2025
    Two officers of Parappan Agrahar Jail suspended
    कर्नाटक

    परप्पन अग्रहार कारागृहातील दोन अधिकारी निलंबित

    November 11, 2025
    Reorganization of the NJD executive committee
    कर्नाटक

    निजद कार्यकारिणीची पुनर्रचना

    November 11, 2025
    BJP demands resignation of Chief Minister, Home Minister
    कर्नाटक

    भाजपकडून मुख्यमंत्री,गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

    November 11, 2025
    Signature collection report against vote rigging submitted to High Command
    कर्नाटक

    मतचोरीविरुद्धचा स्वाक्षरी संकलन अहवाल हायकमांडला सादर

    November 11, 2025
    वेब स्टोरी
    [web_stories title="true" excerpt="false" author="true" date="false" archive_link="false" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="2" number_of_stories="4" order="DESC" orderby="post_date" view="grid" /]
    ई-पेपरची सदस्यता घ्या
    Copyright © 2015 ThemeSphere. Powered by WordPress.
    • About
    • About
    • Privacy
    • Privacy
    • Contact
    • Contact
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • About
    • About
    • Privacy
    • Privacy
    • Contact
    • Contact
    Copyright © 2015 ThemeSphere. Powered by WordPress.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.