रुक्मिणी भगवान श्रीकृष्णाला पुढे म्हणते-
अनुरूप वरिं म्हणोनि वदलां । तरी अनुरूप जाणोनि पूर्वींच वरिलां । त्रिजगदधीश जो दादुला। इहामुष्मिककामद जो ।तया तुम्हांहूनियां थोर। बहळभयाकुळ पामर । अनुरूप वरिं हें उत्तर । जाडय़तर कीं नाहीं ।तवांघ्ा्रिपद्माप्रति शरण । मजकारणें हें अनुरूप पूर्ण । असो ऐसें मम प्रार्थन। स्वामीलागोन नित्यत्वें ।सृतिशब्दें संसृतीमाजी । देवतिर्यड्मर्त्यराजी। अक्षयसुखार्थ तव पदकंजीं। न भजोनि झाली भ्रमग्रस्त ।तया भमाचें कारण। वेदार्थफळवाद करूनि श्रवण । इहामुष्मिक अभिवांछून । करिती भ्रमण भवस्वर्गीं ।पशुबंध सोमचयन पौण्ड्रक । वाजपेय गोमेध हयमेध मुख्य। ज्योतिष्टोमादि मख सम्यक । करूनि याज्ञिक भवीं भ्रमती । इहामुष्मिक नश्वर फळ । यज्ञाचरणीं क्लेश बहळ । वेदार्थवादांचें देवोनि बळ । संसृतिव्याकुळ त्रिविधत्वें । देवतिर्यड्मानव भ्रमती । त्यांमाजी कोणी तव पदभक्ति । अनुसरतां तो अमृतावाप्ति। लाहे निश्चिती पदभजनें । भवाभास जो हा अनृत । करणगोचर विवर्तभूत । त्याचा अपवर्ग म्हणिजे अंत। इत्थंभूत पदभजनें । ज्या पदभजनास्तव भवनाश । भजकां आत्मत्वीं समरस । ते तव चरण भवभीतांस । शरणागतांस शरण्य । अनुरूप म्हणिजे भजनायोग्य। सर्व भयाचा जेथ भंग । जाणोनि म्यां वरिला श्रीरंग । जडतां ममाङ्ग न शिवे पैं । आणिक प्रभूची विपरीत उक्ति । रोषें निरूपी भीमकी सती । लोकपाळांच्या नृपविभूति । त्या तुज वांछिती सप्रेम । बलाढय़ धनाढय़ गुणाढय़ भूप । रूपें स्मराचा करिती लोप । ज्यांचा अचाट वीर्यप्रताप । गुणगण अमूप जयांचे ।
रुक्मिणी श्रीकृष्णाला म्हणते-आपण म्हणता की, मी एखाद्या राजकुमाराला वरावे. पण भगवन! सर्व गुणांचे आश्रयस्थान असणाऱया संतांनी स्तविलेल्या, लोकांना पाप-तापापासून मुक्त करणाऱया, लक्ष्मीचे निवासस्थान असणाऱया आपल्या चरणकमलांचा सुगंध एकदा घेतल्यावर आपला स्वार्थ-परमार्थ जाणणारी कोणता मनुष्य-स्त्री ते सोडून नेहमी मोठय़ा भयांनी ग्रासलेल्यांचा स्वीकार करील? हे प्रभो! इह-परलोकातील सर्व आशा पूर्ण करणाऱया, तसेच सर्वांचा आत्मा असणाऱया व मला अनुरूप अशाच जगदीश्वरांना मी वरले आहे. मला माझ्या कर्मानुसार वेगवेगळय़ा योनीत भटकावे लागले तरी नेहमी आपले भजन करणाऱयांचा मिथ्या संसारभ्रम नाहीसा करणाऱया व त्यांना आपले स्वरूपसुद्धा देऊन टाकणाऱया अशा आपल्या चरणांनाच मी शरण असावे.
जळो तें दुर्भगेचें वदन । म्हणे अंजलि भंगून। जे विषयान्ध मूर्ख अज्ञान । ते तीलागून वर होत । ते कोण ऐसें म्हणाल स्वामी । जे उपदेशिले प्रेमसंरंभी। जे निरंतर स्त्रियांचे सद्मी । वर्तती कर्मीं तिर्यग्वत् । अच्युतैश्वर्यविराजमान । यालागीं अच्युत संबोधन। देऊनि निरूपी नृपांचे गुण । परमसज्ञान वैदर्भी। तुम्हीं उपदेशिले जे राय । तयांचें ऐश्वर्य सांगों काय। स्त्रियांचे सदनीं तिर्यक्प्राय । वर्तती सोय ते ऐका । केवळ रासभाचिये परी । प्रपंच ओझें वाहती शिरिं । किम्वा बलीवर्दाचे परी । गृहव्यापारिं
कृषीवलवत् ।
ऍड. देवदत्त परुळेकर