बेळगाव : ऍप्टेक एव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटी बेळगाव या अकॅडमीच्या चार विद्यार्थ्यांची इंडिगो एअर लाईन्स या कंपनीच्या ‘एअर फेअर्स आणि टिकेटींग’ या डिपार्टमेंटमध्य पुण्यासाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सतत कार्यरत असणाऱया या अकॅडमीने चार विद्यार्थ्यांचा नुकताच गौरव करून त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मोहम्मद खालिद खैरदी (शाहूनगर), मोनिश काकडे (शहापूर), फैनिया जकाती (गोकाक), फैज जकाती (गोकाक) अशा चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. कोरोनामुळे चालू असलेल्या मंदीच्या काळातही ऍप्टेक अकॅडमीने विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणे खऱया अर्थाने प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबाबत अकॅडमीबाबत त्यांच्या पालकांनी आपल्या भावनातून अकॅडमीत येऊन गौरवोद्गार काढले.









