जिल्हय़ात आणखी 133 पॉझिटिव्ह : 74 जणांना डिस्चार्ज : सक्रिय संख्या 1,158
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच असून बुधवारी आणखी 133 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांची संख्याही वाढत असून आणखी 74 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण दोन हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
गेल्या तीन दिवसांत कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच आहे. सोमवारी 48, मंगळवारी 80, तर बुधवारी 133 रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्णांची एकूण संख्या 3 हजार 298 झाली आहे. रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. बुधवारी 74 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे एकूण 2 हजार 72 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तीचे प्रमाण हे 65 टक्क्यांच्या पुढे गेले आहे. तर आतापर्यंत 68 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्हय़ात 1 हजार 158 कोरोना रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 23668
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 3298
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 20079
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 291
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 1158
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 68
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 2072
गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 8027
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12836









