ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेची उत्पादने पुढील काळात शासकीय कार्यालयात वापरणार असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.
खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेच्या
व्यावसायिक संकेतस्थळाचे अनावरण देसाई यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेच्यावतीने पर्यावरणपूरक हातकागदाची निर्मिती केली जाते. संस्थेची सर्व उत्पादने आता ऑनलाईन उपलब्ध झाल्याने संस्था मोठ्या प्रमाणात लोकांपर्यत पोहोचेल, असा विश्वास देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.
हातकागद संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकाराचे कागद, फाईल्स, पॅड कव्हर, डायरी, दिनदर्शिका, तयार केले जातात. या सर्व उत्पादनांना लोकांची मागणी वाढत आहे. याबाबत मंडळाने व्यावसायिक स्वरुपात www.punehandmadepapers.com हे संकेतस्थळ विकसित केले आहे.