ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्चपासून पर्यटकांसाठी बंद असलेला ताजमहल आणि आग्रा किल्ला आजपासून (दि. 21) म्हणजेच जवळपास 7 महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
ताजमहल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. एका दिवसात 5 हजार पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येईल. सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे, म्हणून दोन शिफ्ट करण्यात आल्या आहेत. पहिल्या शिफ्टमध्ये 2500 पर्यटकांना प्रवेश देण्यात येईल. प्रत्येकाच्या शरीराचे तापमान तपासण्यात येईल. पर्यटकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क बंधनकारक असेल. पर्यटकांना प्रवेश तिकीट पार्किंग शुल्कासह ऑनलाईन घ्यावे लागणार आहे.