सांगली / प्रतिनिधी
पाशवी बहुमताच्या जोरावर भलेही तुम्ही कायदा कराल पण लक्षात ठेवा सध्याच्या युगात बळीला पाताळात गाडणे एवढे सोपे नाही. आमच्या हातात दगड आहेत व तुमच्या काचा आहेत असा जोरदार इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोदी सरकारला दिला आहे.
शेती सुधारणा विधेयक बद्दल आपली भूमिका मांडत शेट्टी यांनी माध्यमांसाठी एक व्हिडिओ जारी करून हा इशारा दिला आहे. शेतीला कार्पोरेटच्या तावडीत देण्याचा प्रयत्न विविध पक्षांना हाताशी धरून केला आहे. पण, शेतमालाला हमी भाव मिळवणे हा शेतकऱ्याचा जन्म सिद्ध हक्क आहे. आणि त्यासाठी प्रसंगी शेतकरी हातात दगड घेईल असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.