उच्चांकी 38 बळी जिल्ह्यात कोरोनामुक्ती 20 हजार पार, रात्री उशिरा अहवालात 732 बाधित सातारा, कराडसह जिल्हा हॉटस्पॉट, ऑक्सिजन चळवळीला आली गतीबेड नसल्याची ओरड सुरुच, एकूण बळींची संख्या 866
5,183 जण होम आयसोलेटेड
प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ात कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण चिंता वाढवत असताना वाढत्या मृत्यूदराने नागरिकांच्या मनात भीती वाढतेय. रविवारी 38 एवढी उच्चांकी कोरोना बळींची संख्या पुढे आली. मात्र ही भीती घालवण्यासाठी सर्वजण एकमेकांना धीर देत लढा देण्याचा प्रयत्न करत असले तरी बेड नसल्याची ओरड सुरुच आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजनची आवश्यकता पाहून जिल्हय़ात अनेक संघटना, काही व्यक्तींनी ऑक्सिजन मशीन खरेदी करुन त्या मोफत पुरवण्याचे सुरु केलेले काम दिलासादायक ठरत आहे. जिल्ह्यातील नागरिक काळजी घेत आहेत. आरोग्य विभागाच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवून लढत आहेत. जेव्हा वाढणाऱ्या बाधितांची संख्या थांबत जाईल तेव्हा हा लढा यशस्वी होईल.
दरम्यान, जिल्ह्यात काल शनिवारी रात्री आलेल्या अहवालात 977 नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत. मात्र रविवारी सायंकाळपर्यंत 384 एवढय़ा जणांनी कोरोनावर मात केली असून रात्री उशिरा अहवालात 732 एवढय़ा जणांचा अहवाल बाधित आला आहे तर 38 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनामुक्ती 20 हजार पार
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 384 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून एकूण कोरणा मुक्ताची संख्या वीस हजार पार जाऊन 20,250 एवढी दिलासादायक झाली आहे. मात्र होम आयसोलेटेड असलेले नागरिक कसे कोरोनामुक्त झाले, केव्हा होत आहेत. त्यांचा कालावधी पूर्ण झाला का याबाबतची माहितीही आरोग्य विभागाने देण्याची मागणी होत आहे. त्यामुळे भीतीचा पगडा कमी होण्यास मदत होईल.
सातारा, कराडसह जिल्हा हॉटस्पॉट
सप्टेंबर महिन्याच्या मध्यानंतर कोरोनाची स्थिती चिंताजनकच आहे. सर्वच तालुक्यात बाधितांची संख्या वाढत असून यामध्ये सातारा व कराडमध्ये प्रमाण खूपच आहे. या दोन्ही तालुक्यात बाधितांचा आकडा मोठा असून बळींची संख्याही सातारा 240, कराड 143 एवढी मोठी आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये होम आयसोलेट असणारांचे प्रमाण मोठे असून होम आयसोलेट असलेल्या नागरिकांना आरोग्य यंत्रणेकडून किट मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. आरोग्य सेविका, आशा सेविकांमार्फत यांचा फालोअप घेतला जात असला तर दुसरा कोणताही दिलासा त्यांना मिळत नाही. आपल्याच जीवावर उदार होवून हे रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा लढत आहेत.
वाढत्या मृत्यूदराने चिंता
जिल्हय़ातील बाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा 900 नजिक असून आजपर्यंत एकूण 866 जणांचा बळी गेला आहे. गेल्या दोन महिन्यात मृत्यूदरात वाढ झाली असून दररोज दोन आकडी संख्येने चिंता वाढत आहे. रविवारी आलेल्या अहवालात उच्चांकी 38 बाधितांचा मृत्यू झाला असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह 45 वर्षांपासून पुढे ते 85 पर्यंतच्या नागरिकांचा समावेश आहे. ज्येष्ठ रुग्णांना उपचारास नेले आणि त्यांचा मृत्यू झाला की तो कोरोना बळी ठरवला जात असल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचा वातावरण आहे. कोरोना बाधितांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याबरोबरच ही लढाई एकमेकांना सावरत, धीर देत लढायची आहे याचे भान प्रत्येकाला येण्याची गरज आहे.
5 हजार 183 जण होम आयसोलेटेड
जिल्ह्यात सध्या उपचारार्थ रुग्णांची संख्या 9,708 एवढी असली तरी त्यापैकी 5 हजार 183 जण होम आयसोलेटेड आहेत. हे सर्व आरोग्य विभागाच्या संपर्कात असून त्यामुळे प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3 हजार 793 एवढी आहे. यापैकी 1,146 रुग्ण विविध कोरोना केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन आहेत. म्हणजे शासकीय हॉस्पिटल व खासगी हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष उपचारार्थ रुग्णांची संख्या 2,647 एवढी आहे. तरीदेखील आरोग्य यंत्रणेचा गोंधळ का उडतो आहे ?असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
जिल्हय़ात 38 बाधितांचा मृत्यू
सातारा तालुका- शेळकेवाडी 65 वर्षीय महिला, गुजर आळी सातारा 78 वर्षीय पुरुष, वडुथ 52 वर्षीय महिला, पंताचा गोट 58 वर्षीय महिला, केसरकर पेठ सातारा 49 वर्षीय पुरुष, शाहूनगर गोडोली 65 वर्षीय पुरुष, अपशिंगे 62 वर्षीय महिला, वळसे 45 वर्षीय पुरुष, सातारा 57 वर्षीय पुरुष, संगममाहूली 64 वर्षीय पुरुष.
कराड तालुका- पेरले 75 वर्षीय पुरुष, कुसुर 68 वर्षीय पुरुष, विंग 65 वर्षीय महिला, वनवासमाची 69 वर्षीय पुरुष, इंदोली 68 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर 56 वर्षीय पुरुष, विरवडे 58 वर्षीय पुरुष, साळशिरंबे 55 वर्षीय महिला, आणे 77 वर्षीय पुरुष, बेलवडे 70 वर्षीय पुरुष, कराड 40 वर्षीय महिला, कराड 65 वर्षीय पुरुष, पाल 75 वर्षीय पुरुष.
वाई तालुका विरमाडे येथील 65 वर्षीय पुरुष, धर्मपूरी वाई 32 वर्षीय पुरुष. खटाव तालुका – काळेवाडी डिस्कळ ता. खटाव 83 वर्षीय पुरुष. कोरेगाव तालुका – तांदुळवाडी पाल 70 वर्षीय पुरुष.
खंडाळा तालुका खंडाळा येथील 85 वर्षीय महिला, वाठार कॉलनी खंडाळा येथील 72 वर्षीय पुरुष, जावळे 85 वर्षीय महिला, घाटदरे 68 वर्षीय महिला, बावडा खंडाळा 64 वर्षीय व 60 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी 69 वर्षीय पुरुष, भादवडे 50 वर्षीय पुरुष, शिरवळ 53 वर्षीय पुरुष.
माण तालुका- गोंदवले ता. माण 70 वर्षीय पुरुष,
सांगली जिल्हा कडेगाव 70 वर्षीय पुरुष
269 जणांचे नमुने तपासणीला
सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 15, खंडाळा 64, पानमळेवाडी 74, मायणी 66, महाबळेश्वर 50 असे एकूण 269 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 62,579
एकूण बाधित 30,814
एकूण कोरोनामुक्त 20,250
मृत्यू 866
उपचारार्थ रुग्ण 9,708
रविवारी
एकूण बाधित 732
एकूण मुक्त 384
एकूण बळी 38