प्रतिनिधी / वाई
वाई शहरात अज्ञात चोरट्यांनी शटरचे कटावणीच्या साह्याने कुलुप तोडुन शटर वाकवून आत प्रवेश करुन तिन हजार रुपये चोरुन चोरटे लंपास झाले होते. चोरट्यांचे हे आवाहन वाई पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांनी यस्विकारुन अवघ्या २४ तासातच चार आरोपींच्या मुसक्या आवळुन वाईच्या न्यायालयात ऊभे केले असता त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
वाई शहराच्या ग्रामीण रुग्णालया समोरील इमारतीतमध्ये शेखर धोंडिराम शिंदे (वय ३६ रा. सिध्दनाथवाडी) यांच्या मालकीचे भाग्यदिप सिकुरीटी फोर्स या नावाचे कार्यालय आहे. या कार्यालयातून बँका पतसंस्था गृह निर्माण सोसायट्या यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम केले जाते.
दि,१६ च्या सायंकाळी नेहमी प्रमाणे शेखर शिंदे हे आपले कार्यालय बंद करुन घराकडे निघुन गेले पण दि, १७ रोजी सकाळी पुन्हा कार्यालय उघडण्यासाठी आले असता कार्यालयाच्या शटरचे कुलुप तोडलेले व शटर वाकवलेल्या अवस्थेत आढळून आले त्यांनी आत प्रवेश करुन पाहीले असता लाकडी टेबलच्याच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले रोख ३ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेहल्याचे लक्षात आले.
यावेळी शिंदे यांनी दि,१७ रोजी वाई पोलिस ठाण्यात जाऊन चोरी झाली असल्याची तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी गंभीर दखल घेऊन सपोनि आशिष कांबळे यांच्यावरही कामगिरी सोपवली. त्यांनी तात्काळ पोलीस जवान प्रशांत शिंदे श्रवणकुमार राठोड यांना सोबत घेऊन चोरी झालेले ठिकाणची पाहणी करुन गंणपती मंदिरा लगत असणाऱ्या गुरे बाजार झोपडपट्टीत सापळा लावला २४ तासाच्या आतच अक्षय गोरख माळी (वय २०) जगु वसंत पवार( वय २४ ) सागर सुरेश जाधव (वय २२) गणेश शंकर जाधव (वय २१ सर्व राहणार गुरे बाजार झोपडपट्टी वाई )
या चोरांच्या टोळीला गजाआड करण्यात यश आले. चारही आरोपींना वाईच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे आशिष कांबळे व त्यांच्या सहकार्यानी अवघ्या २४ तासातच गुन्हा उघडकीस आणल्या मुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.