
रशियात दिवसभरात 6,065 नवे बाधित सापडले आहेत. तर एक दिवसापूर्वी 5,905 नवे रुग्ण आढळले होते. रशियाच्या 84 क्षेत्रांमध्ये हे नवे रुग्ण सापडले आहेत. नव्या रुग्णांमध्ये 825 मॉस्कोत, 212 सेंट पीटर्सबर्ग आणि 180 रोस्तोव क्षेत्रात आढळले आहेत. मागील 24 तासांमध्ये देशात 144 जणांना जीव गमवावा लागला आहे. रशियातील बळींचा आकडा आता 19,339 वर पोहोचला आहे. रशियात लवकरच स्पुतनिक-5 लस सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहे.








