प्रतिनिधी / दापोली
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका कार्यक्रम सन 2020-21 मध्ये दापोली तालुक्यातील मौजे माळवी येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. त्यानिमित्त उपविभागीय कृषी अधिकारी, दापोली श्री. कुटे यांनी उपस्थित राहून मृदा आरोग्य, सेंद्रिय शेती, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, मृदेचे गुणधर्म याबत सखोल मार्गदर्शन केले.
तसेच मग्रारोहयो फळबाग लागवड, ”विकेल ते पिकेल” संकल्पना याबाबत ही विस्तृत विवेचन केले. त्यावेळी मंडळ कृषी अधिकारी वेळवी श्री. जाधव यांनी मार्गदर्शन केले. मृदा आरोग्य पत्रिका बाबत विषेतज्ञ म्हणून एस.एस. अबगुल कृषि पर्यवेक्षक, दापोली यांनी सादरीकरण केले. त्यावेळी कृषी पर्यवेक्षक केळशी श्री. म्हस्के, कृषी पर्यवेक्षक वेळवी श्री. भावे आणि कृषी सहायक श्री. गेंड आदी उपस्थित होते.
Previous Articleचोरीचा मामला आता पाच भाषांमध्ये
Next Article पोलिसांनी ताब्यात घेतलेला तरुणाचा मृत्यू









