प्रतिनिधी / दापोली
दापोली तालुक्यातील विविध रस्त्यांवर उभी असणारी मोठाली झाडे दिवसाढवळ्या तोडून नेणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे आदेश खुद्द आमदार योगेश कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. शिवाय आमदार कदम यांनी याबाबत बोटचेपी भूमिका घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाची चांगलीच कानउघडणी केली आहे.
दापोली नगरपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील रस्त्यांवरील दिवसाढवळ्या झाडे चोरीला जाण्याचा विषय चांगलाच गाजला आमदार योगेश कदम या विषयावर प्रचंड संतप्त झाले होते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दापोलीतील जागरूक नागरिकांनी याबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत किंवा युवासेनेने देखील आता या विरोधात दंड थोपटले आहेत तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाकडून बोटचेपी भूमिका घेऊन घेतली जात आहे यामुळे दिवसाढवळ्या झाडे तोडून येणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे त्यांच्यावर अद्याप कोणत्याही स्वरुपाची कारवाई झालेली नाही.
या गोष्टीकडे दापोलीतील पत्रकार व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार योगेश कदम यांचे लक्ष वेधले हे कळल्यावर आमदार योगेश कदम कमालीचे संतप्त झालेले यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेतले व त्यांना अद्याप कारवाई का करण्यात आलेली नाही याचा जाब विचारला यावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी आमची मोजणी सुरू आहे.
असे थातुरमातुर उत्तर देऊन बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला मात्र तक्रारदारांनी तक्रार करून एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला असताना ही तुम्हाला मोजणी करायला आणखीन किती दिवस लागणार असा प्रश्न योगेश कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला शिवाय येत्या आठवड्याभरात सर्व मोजदाद पूर्ण करून ज्यांनी बेकायदा उभी जिवंत झाडे तोडली आहेत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे अशी असा आदेश आमदार योगेश कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे यामुळे आता तरी सार्वजनिक बांधकाम विभाग दिवसाढवळ्या रस्त्यावरील झाडे तोडून देणाऱ्यांवर कारवाई करेल अशी आशा दापोली कर बाळगून आहेत.
या सभेला नगराध्यक्षा परवीन शेख, तहसीलदार वैशाली पाटील, मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्यासह अनेक खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
Previous Articleसोलापूर जिल्ह्यातील एसटी सेवा बंदचे आदेश – जिल्हाधिकारी
Next Article चोरीचा मामला आता पाच भाषांमध्ये









