जयसिंगपूर / प्रतिनिधी
दुबई येथून पहिला रुग्ण महाराष्ट्रामध्ये आला. त्यानंतर गेल्या पाच महिन्यात कोरोना खेड्यापाड्यापर्यंत पोहोचल्यामुळे गेल्या पाच सहा महिन्यात आपण संघर्ष करीत आहोत. खासगी दवाखान्यांमध्ये योग्य उपचार होत नसल्यामुळे व काही लोकांनी कोरोनाचा व्यवसाय सुरू केल्यामुळे गोरगरिबांना उपचार घेणे जेमतेम ठरत आहे. उपचार घेणे अशक्य झाले आहे. शासकीय स्तरावर यावर पर्यायी उपलब्ध करण्यात येत असून यासाठी कोरोनाशी लढा देण्यासाठी राज्यामध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
आज शासनाच्यावतीने जवळपास पस्तीस हजार आठशे बेड उपलब्ध करून देण्यात आले आहे.
7000 व्हेंटीलेटर बेड उपलब्ध आहेत. जिल्ह्याचा मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण घरोघरी सुरू करण्यात आली आहे. आरोग्याची जनजागृती करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. जयसिंगपूरमध्ये अद्यावत असे शंभर बेडचे सेंटर उपलब्ध करून देण्याचा संकल्प नक्कीच गौरव नक्किच गौरवास पात्र आहे. भविष्यात गरज लागली तर 200 बेड सुद्धा उपलब्ध करून देण्याची तयारी आहे. असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जयसिंगपूरातील लोकवर्गणीतून उभारलेल्या 100 शंभर बेडच्या कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन ,संजय पाटील-यड्रावकर उपनगराध्यक्ष जयसिंगपूर नगरपालिका , राजश्री शाहू आघाडीचे व ताराराणी आघडीचे नगरसेवक नगरसेविका व उदार देणगीदार यांच्या सहकार्यातून उभारण्यात आलेले 10 व्हेटीलेटर व 100 ऑक्सीजन बेडचे मोफत कोविड सेंटरचा लोकार्पण सोहळा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते सिद्धिविनायक गणपती मंदिर जवळील हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी राज्याचे नगर विकास मंत्री अनंतराव शिंदे यांनी ऑनलाइन शुभेच्छा देऊन सेंटरच्या कार्याची कौतुक केले. तसेच त्यांनी शिंदे खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने रुग्णवाहिका नगरपरिषद देण्याचे मान्य केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल , प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे – धुमाळ ,मुख्याधिकारी टिना गवळी , सिविल सर्जन कॅम्पिं पाटील ,डॉक्टर पीएस दातार , उद्योजक विनोद घोडावत, शाम सुंदर मालू, प्रकाश झेले, दशरथ काळे, पंचायत समिती सभापती कविता चौगुले, सतीश मलमे , यांच्यासह पालिकेतील दोन्ही आघाडीचे नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते.