बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवण्यात भाजप सरकार कमी पडत असल्याने त्यांनी आपले अपयश लपविण्यासाठी मुद्दाम ड्रग प्रकरण तयार केले आहे. अशी टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री यू. टी. खादर यांनी केली आहे.
सोशल मीडियावर त्यांनी भाजपा नेते लोकांचे लक्ष वेधण्यासाठी पारंगत आहेत. कोरोना साथीच्या रोगाचा संसर्ग रोखण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. दरम्यान सरकार शेतकरीविरोधी आणि कामगार कायद्यात सुधारणा, नैसर्गिक आपत्तीतील मदत आणि बचाव कार्य यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांना टाळून ड्रग्स व्यवसायाची चौकशी करण्याच्या नावाखाली राज्यातील जनतेची दिशाभूल करत असल्याचे म्हंटले आहे.
खादर यांनी अंमली पदार्थांच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्याच्या कायद्यात मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करावी लागेल. या कायद्यात सुधारणा करण्याची राज्य सरकारची कोणतीही योजना नाही, केवळ विरोधी पक्षनेत्यांवर खोटेनाटे आरोप करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.