बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात ड्रग तस्करीचा धुमाकूळ सुरु आहे. शुक्रवारी सेंट्रल क्राइम ब्रँच (सीसीबी) पोलिसांनी दोन ड्रग्ज विक्रेत्यांना अटक केली. त्यांच्याकडून ४ लाख रुपयांच्या एक्स्टसी टॅबलेट, एलएसडी आणि गांजा-लेस्ड (टेट्राहायड्रोकायबिनोल) जेली जप्त केली आहे.
गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार गांजाने तयार केलेली जेली विशेषत: हानिकारक आहे कारण यामुळे ती मुलांना आकर्षित करू शकते.
याप्रकरणी जॉन निकोलस (वय २१) रा. कोथानूर आणि इरफान शेख (२९) रा. जे. पी. नगर असे अटक केलेल्यांची नावे आहेत. याआधी सीसीबी पोलिसांनी ड्रग प्रकरणी अभिनेत्री संजना, रागिणी आणि सहकाऱ्यांना अटक केली आहे.









