प्रतिनिधी /मंडणगड :
सर्वोच्च न्यायालयाने मराठी समाजाच्या आरक्षणाला दिलेल्या स्थगितीच्या निर्णयाबाबत सकल मराठा समाज व संभाजी ब्रिगेड तालुका संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले. यामध्ये राज्य सरकारने तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
मराठा आरक्षण प्रश्नावर शहरातील जयभवानी पतसंस्थेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किशोर दळवी, विनोद जाधव, किशोर कदम, प्रकाश दळवी, सुरेश दळवी, जयश्री दळवी, मनिष शिंदे, राकेश शिंदे, नितीन म्हामुणकर, संतोष घोसाळकर, योगेश जाधव, शैलेश राणे आदी उपस्थित होते.
संभाजी बिग्रेड तालुका शाखेच्यावतीनेही निवेदन देऊन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मराठा आक्षणासाठी घटना दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष भरत सरफरे, कार्याध्यक्ष श्रीकांत जाधव, कोषाध्यक्ष विजय अधिकारी, शहराध्यक्ष सूर्यकांत जाधव, शहर संघटक गणेश भागवत उपस्थित होते.









