इस्रायलमध्ये दिवसभरात 6,063 नवे रुग्ण सापडले आहेत. महामारीच्या प्रारंभापासून प्रतिदिन सापडणाऱया रुग्णांमध्ये हा आकडा सर्वाधिक ठरला आहे. यापूर्वी 14 सप्टेंबर रोजी 4,764 नवे रुग्ण आढळले होते. देशात दिवसभरात 18 जणांचा बळी गेला आहे. देशातील गंभीर रुग्णांची संख्या आता 549 वर पोहोचली आहे. उत्तर इस्रायलमधील रुग्णालयांची क्षमता कमी पडू लागल्याने रुग्णांना आता मध्य आणि दक्षिण इस्रायलमधील रुग्णालयांमध्ये हलविण्यात येत आहे.
रिचार्जेबल मास्क

बाजारात सद्यकाळात नव्या प्रकारचे मास्क मिळू लागले आहेत. सर्जिकल, डिस्पोजल, एन95 नंतर आता रिचार्जेबल मास्क चर्चेत आहे. हा मास्क दोन प्रकारे किटाणूंना रोखतो. या मास्कचे पोर्स अत्यंत छोटे असतात आणि याला मॅकेनिकल फिल्ट्रेशन म्हटले जाते. तसेच याच्या आतमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज असतात, जे किटाणूंना स्वतःच्या दिशेने आकर्षित करतात आणि बाहेरच रोखतात.









