प्रतिनिधी / गगनबावडा
कुठे विनापरवाना विक्री, तर कुठे विनापरवाना साठा, कुठे बेकायदा वाहतूक अशा अवैद्य धंद्यावर गेल्या आठवड्यापासून गनबावडा पोलिसांनी धाडसत्र सुरु केल्याने तालुक्यातील अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. सहा पैकी फक्त निवडे गावांत चारवेळा कारवाई करण्यात आली आहे. दैनिक तरुण भारतच्या वृत्ताची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
गगनबावडा सहाय्यक पोलिस निरीक्षक संगिता पाटील यांनी तालुक्यात ठिकठिकाणी धाड टाकून थेट केलेल्या कारवाईने गेला आठवडा चर्चेत राहिला. पाच दिवसांत सहा ठिकाणी कारवाई करुन अवैद्य व्यावसायिकांना धडकी भरली आहे. निवडे येथे विनापरवाना दारु विक्री प्रकरणी सचिन बाळू कांबळे याचेवर कारवाई केली आहे. निवडे येथे विनापरवाना दारु साठा केल्याप्रकरणी सतपाल रंगराव पाटील याच्यावर कारवाई केली आहे.
निवडे येथे विनापरवाना दारु विक्री केल्याप्रकरणी संदिप पांडुरंग डाकवे यांचेवर कारवाई करुन 3340 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडे फाट्यावर विनापरवाना दारुसाठा केल्याप्रकरणी अमोल अरुण माने यांचेवर कारवाई करुन 6568 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खडूळे येथे विनापरवाना दारु विक्री केल्याप्रकरणी भारत बंडोपंत पाटील यांच्यावर विना परवाना हाल नेते असलेली कारवाई करुन एक दुचाकी व 17374 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धुंदवडे येथे विना परवाना दारु साठा केल्याप्रकरणी तानाजी धोंडीराम पाटील याचेवर कारवाई करुन 21840 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









