सातारा / प्रतिनिधी
वाई येथील बावधन नाक्यावर अज्ञात मालट्रकने साहेबराव गोपाळ कसबे या पादचाऱ्यास पाठी मागुन धडक देऊन जखमी केल्याची घटना दि.16 रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातातील मालट्रकचा शोध वाई पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने लावून ट्रक चालकास ताब्यात घेतले.
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वाई येथील बावधन नाका येथे अज्ञात वाहनाने धडक देऊन एकास जखमी केल्याची घटना घडली. जखमी होऊन रस्त्याकडेला बेशुद्ध अवस्थेत पडले होते. मालट्रकचा चालक मालट्रक सह पाचगणीच्या दिशेने पळून जाण्यास यशस्वी झाला होता.या अपघाताची माहिती अज्ञाताने वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना फोनद्वारे दिली. त्यांनी रात्र गस्तीवर असणारे पोलीस कर्मचारी संजय पवार, सिध्देश्वर वाघमोडे यांना सूचना देताच ते अपघात स्थळावर पोहचुन त्यांनी जखमीला तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी हवालदार एस. एस. जाधव, गुन्हे प्रगटीकरण शाखेचे एस. बी. राठोड यांना सोबत घेऊन पहाटे अपघात करुन पळून गेलेल्या मालट्रकचा शोध घेण्यासाठी वाई सातारा रोडवरील वाई एसटी स्टँड ते भिम नगर तिकाटणे आणि पाचगणी या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या सीसीटीव्हीच्या फुटेजचा आधार घेत घेत अवघ्या काही तासातच ही पोलीस यंत्रणा पाचगणी परिसरात असणाऱ्या गोडोली (ता. महाबळेश्वर) येथे जाऊन मालट्रक चालक धनराज कृष्णदेव मालुसरे याच्यापर्यंत पोहचले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सापडलेल्या मालट्रकचा नंबर आणि उभा असलेल्या मालट्रकचा नंबर एकच असल्याची खात्री झाल्यानंतर संशयितास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी चालक धनराज मालुसरे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांने सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. चालकासह मालट्रक ताब्यात घेऊन वाई पोलिस ठाण्यात आणल्यावर गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून ट्रक जप्त करण्यात आला असून वाई पोलीस तपास करत आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









