बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) बुधवारी राज्यभरातील एसएसएलसी पुरवणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवास जाहीर केला. जे विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत फक्त त्याच विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
२१ ते २८ सप्टेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश तिकिट निर्मितीसाठी शहर व उपनगरी, सामान्य आणि एक्स्प्रेस बसेसमध्ये त्यांचे निवासस्थान व परीक्षा केंद्रा दरम्यान मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात येईल, असे एका निवेदनात म्हटले आहे.









