बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बेंगळूरमध्ये आयसीयू बेडची कमतरता भासत असल्याचे समोर येत आहे. बेंगळूर शहरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज तीन हजारांहून अधिक कोरोना सापडत असल्याने समस्या आणखी वाढली आहे. कर्नाटकात मंगळवारी कोरोनाचे ७,५७६ नवीन रुग्ण सापडले यापैकी बेंगळूरमध्ये गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ३,०८४ नवीन रुग्ण आढळले आहेत.
राज्यातील आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रूग्णांची संख्या पहिल्यांदा८०० च्या वर गेली आहे. आयसीयूमध्ये दाखल झालेल्या एकूण ८०७रुग्णांपैकी २८८रुग्ण बेंगळूर मधील रुग्णालयात आहेत.
आयसीयूचे बेड कागदावर उपलब्ध असूनही अनेक लहान रुग्णालये बेड वितरीत करण्यात अपयशी ठरले आहेत. मोठ्या रुग्णालयांमधील केवळ २९ रुग्णालये ५० टक्के बेड पुरविण्यास सक्षम आहेत. गरीब आणि वंचित कोरोना रूग्णांसाठी काम करणार्या स्वयंसेवकांच्या माहितीनुसार बर्याच खासगी रुग्णालयांनी ५० टक्के बेड देण्यास पाठिंबा दर्शविला आहे.
बेंगळूरमध्ये बेड व्यवस्थापन अधिकारी तुषार गिरीनाथ यांनी रुग्णांची संख्या वाढल्यामुळे गुरुवारपासून ही समस्या उद्भवली आहे. खासगी रुग्णालयांनी दिलेल्या आश्वासनानुसार रुग्णालये ५० टक्के बेड्स सरकारला देतील यासाठी प्रयत्नशील आहे, असे म्हंटले आहे.









