नवी दिल्ली
ग्राहकांना इंटरनेटची योग्य सुविधा आणि उपलब्धता निर्माण करुन देण्यासाठी ब्रॉडब्रँडची गती आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याची माहिती भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरणाचे (ट्राय) सचिव एस. के. गुप्ता यांनी दिली आहे. समग्रपणे नियोजन आखण्याची गरज असून वायफाय हॉटस्पॉटचा विस्तार करणे तसेच ब्रॉडब्रँडसाठी केबल टीव्हीचा उपयोग अशा प्रकारे उपाय निर्माण करण्याची माहिती आहे. कारण दूरसंचार सेवामधून चांगली गुणवत्तेची ब्रॉडब्रँडची सेवा मिळत नाही. परंतु यामध्ये एकटय़ा दूरसंचार सेवा देणाऱया कंपन्यांना दोष देणे योग्य नसून यातून योग्य मार्ग शोधणे आणि तो स्विकारण्याची गरज असल्याचे स्पष्टीकरण याप्रसंगी दिले आहे.









