वाई खंडाळा महाबळेश्वर तीन रुग्णवाहिका
१८० कृत्रिम वायूसह खाटा
शंभर जंबो ऑक्सिजन सिलेंडर
प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले यांनी दिली माहिती
प्रतिनिधी / वाई
वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यामधील रुग्णालयामध्ये १८० कृत्रिम वायूसह (ऑक्सिजन) खाटा वाढविण्यात येणार असून, नव्याने तीन रुग्णवाहिका आमदार मकरंद पाटील यांच्या निधीतून दाखल होणार आहेत अशी माहिती प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले यांनी दिली.
वाई खंडाळा आणि महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये सध्या करोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या रुग्णांना कृत्रिम (ऑक्सिजन) वायूसह आणि खाटा मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी प्रांताधिकारी राजापूरकर चौगुले यांना या तीनही तालुक्यांचा आढावा घेऊन याठिकाणी खाटा वाढविण्याचे नियोजन करण्यास आदेश दिले होते. त्याप्रमाणे आज प्रांताधिकारी राजापूरकर चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली वाई खंडाळा महाबळेश्वर येथील अधिकाऱ्यांची बैठक झाली.
या बैठकीमध्ये या तीनही तालुक्यांमध्ये १८० खाटा वाढतील असे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाई ८० खंडाळा व महाबळेश्वरसाठी प्रत्येकी ५० खाटा वाढविण्यात येत आहेत. वाई येथील ग्रामीण रुग्णालयात तीस खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून ते मंगळवारी पासून सुरू होत आहे. याठिकाणी अद्ययावत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. वाई तालुक्यामध्ये वाई ग्रामीण रुग्णालयाबरोबरच कवठे येथील आरोग्य केंद्रातही कोविड सेंटर वाढविण्याच्या त्यादृष्टीने अहवाल तयार करण्यात आला आहे. तेथेही ही कृत्रिम वायु पुरवठ्यासह तीस खाटा वाढविण्यात येणार आहेत.
या तीनही तालुक्यांमध्ये आमदार निधीतून तीन रुग्णवाहिका, नव्याने उभारण्यात येणारे कोविड सेंटर आणि १०० जंबो ऑक्सिजन सिलेंडर पुरविण्यात येणार आहेत अशी माहितीही ही संगीता राजापूरकर चौधरी यांनी दिली. जे रुग्ण घरच्याघरी विलगीकरणात दाखल आहेत त्यांनी आजारपण वाढत असल्यास लपवून न ठेवता जवळच्या किंवा संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना ताबडतोबीने त्याची माहिती देणे गरजेचे आहे. अनेकदा घरच्या विलगीकरणामध्ये असलेले रुग्ण आजार लपवून ठेवत असून तो वाढल्यानंतर त्यांना रुग्णालयात रुग्णालयातील खाटा व अकृत्रिम वायू उपलब्ध करून देण्यामध्ये अडचणी येत आहेत. त्यासाठी संबंधित रुग्णांनी ताबडतोबीने याची कल्पना आरोग्य अधिकाऱ्यांना देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. वाई उपविभागात वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी कोविडं संसर्ग निपटण्या मध्ये येणाऱ्या अडचणी मध्ये मदत करावी. त्यासाठी त्यांनी त्या भागातील तहसीलदार ता प्रांताधिकार्यांनी संपर्क साधावा असे आवाहनही राजापूरकर चौगुले यांनी केले आहे.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘ जबाबदारीने जनतेपर्यंत पोहचवा
वाढत्या करोना संसर्ग बाबत जनजागृती करण्यासाठी शासनाने हाती घेतलेले ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे पण हे अभियान अत्यंत जबाबदारीने जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आहे. त्यादृष्टीने आजच्या बैठकीत चर्चा झाली या अभियान हे अभियान राबवत असताना प्रत्येक भागातील लोकप्रतिनिधींना, सामाजिक कार्यकर्त्यांना यामध्ये समावेश करून घेण्याचा आहे. लोकांना या योजनेमध्ये विश्वास निर्माण होईल असे असे नियोजन करण्यात आले आहे. शहरांमध्ये नगरपालिका नगरपंचायत व ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरावर हा उपक्रम राबविण्याचा आहे.
–संगीता राजापूरकर चौगुले प्रांताधिकारी वाई