जुनी पेन्शन संघटनेचा स्तुत्य उपक्रम
वार्ताहर / धामोड
‘कोरोना’ महामारीच्या संकटकाळात अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागत आहे. याची दखल घेत राधानगरी तालुका जुनी पेन्शन हक्क संघटनेने राधानगरी कोविड सेंटरला सात जंबो ऑक्सिजन सिलेंडरची मदत केली. अशा महामारीच्या संकटकाळात संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
सध्या ग्रामीण भागातही कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णालयात बेड अपूरे पडत आहेत तर अनेक रुग्णांना ऑक्सीजन अभावी जीव गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेच्यावतीने राधानगरी कोविड सेंटरला सात जंबो ऑक्सिजन सिलेंडर प्रदान करण्यात आले. शासनाच्यावतीने राधानगरी पंचायत समिती सभापती सुशिला भावके, उपसभापती मोहन पाटील, गटविकास अधिकारी संदिप भंडारी, गटशिक्षणाधिकारी आर. आर. कुंभार, आरोग्य अधिकारी शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, तालुकाध्यक्ष बाजीराव पाटील, संघटक रणजित जठार, प्रमोद पाटील, सागर पाटील, गिरीश प्रभू, प्रशांत राणे, सुनिल पाटील, राहूल पाटील, नामदेव निकम, विजय पाटील, संतोष फड, संतोष वाईगडे, उध्दव लांडे, सुरेश चांदम, सदानंद मांडरे, वासुदेव डिगे, सुभाष गोरूले, आदीसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. संकटकाळात संघटनेने सामाजिक बांधिलकी जपून अशा प्रकारची मदत केल्याबद्दल शासकीय अधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.









