रविवारी 35 बाधितांचा मृत्यू उच्चांकी 1086 बाधित
ऑक्सिजनची गरज वाढू लागली वीज मंडळावर जबाबदारी वाढली
कराड 280, सातारा 254 बाधित कोरेगाव 111, फलटण 67, खटाव 61
4, 211 नागरिक होम आयसोलेट
प्रतिनिधी / सातारा
ज्या सातारा जिल्हय़ात कोरोनाबाधितांची संख्या नगण्य होती. त्याच सातारा जिल्हय़ात आजमितीस 23,949 एवढी एकूण बाधितांची संख्या झालीय. यामध्ये 14,567 एवढे कोरोनामुक्त असल्याने मुक्तीचे प्रमाण 60 ते 65 टक्के एवढे असले तरी दुसर्या बाजुला बाधितांचे आकडे उच्चांकी येत आहेत. तर मृत्यूदर वाढल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झालीय. रविवारी कोरोना बळींची संख्या 35 असल्याचे प्रशासनाच्या अहवालात सांगण्यात आले असून सातारा, कराडसह सर्वच तालुक्यात मोठय़ा संख्येने बाधितांची संख्या समोर येत असताना जावली तालुक्यात बाधित होण्याचा वेग मंदावत असल्याचे सद्यचित्र आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1086 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 35 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
अखंडित वीज पुरवठा, ऑक्सिजन गरज वाढली
जिल्हय़ात काही रुग्णांना बेडची आवश्यकता असली तरी बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत तर काही रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू लागलीय. त्यासाठी प्रशासनाबरोबरच खासगी संस्था देखील ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी झटू लागल्या आहेत. यामध्ये मात्र जिल्हय़ातील वीजपुरवठा अखंडित ठेवण्याची मागणी होत आहे. कारण ऑक्सिजन मशीन वीजेवर चालते. काहींना घरात जावून ऑक्सिजन मशीन लावण्यात येत आहे. मात्र प्रत्येकाच्या घरी जनरेटर नाही. लाईट गेल्यास ऑक्सिजन मशीन असली तरी त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे वीज पुरवठा अखंडित राखण्याची जबाबदारी वाढलेली आहे.
लॉकडाऊनचा उताराही चालेना
संसर्ग साखळी तुटणे यासाठी लॉकडाऊन करण्यात येत असला तरी बाधित होण्याचे प्रमाण घटेना. दर दिवसागणिक बाधितांची संख्या वाढत असल्याने एकूण उपचारार्थ नागरिकांची संख्या 8,723 एवढी आहे. मात्र त्यापैकी 4,211 बाधित नागरिक होम आयसोलेट आहे. म्हणजे प्रत्यक्ष उपचारार्थ 4,512 आहे. यांच्यावर उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असताना जिल्हय़ात एवढी पॅनिक स्थिती का निर्माण झालीय हेच कोणाला कळेना झालेय.
कोरानाबाधित अहवालामध्ये कराड तालुका 280 बाधित
कराड 9, सोमवार पेठ 4, बुधवार पेठ 7, मंगळवार पेठ 5, शनिवार पेठ 11, रविवार पेठ 3, शुक्रवार पेठ 6, मलकापूर 17, आगाशिवनगनर 7, कार्वे नाका 4, कोयना वसाहत 6, शिवनगर 1, बनवडी 5, रेठरे बु 5, खोडशी 6, तारवे 1, कापील 5, काले 13, शेरे 3, कुसुर 1, रेठरे खुर्द 2, उंडाळे 3, कोळे 1, खुबी 2, आटके 6, उंब्रज 19, विद्यानगर 8, मुंढे 5, धोंडेवाडी 1, किवळ 1, कृष्णा मेडिकल कॉलेज 2, वाठार 3, शिरवडे 8, जाखीणवाडी 2, बेलवडे 1, किर्पे 1, बावडी बु 1, वहागाव 1, अने 1, येरवले 4, ओंढ 2, गोंडी 1, श्री हॉस्पीलट 4, म्होप्रे 2, वाठार 1, शारदा क्लिनीक 2, तांबवे 1, ओगलेवाडी 6, मसूर 7, डिगेवाडी 1, कासार शिंरबे 2, आम्रड 1, कालवडे 1, आरेवाडी 1, सैदापूर 4, रिसवड 2, बेलवडे हवेली 1, गोवारे 1, तळबीड 2, गोटे 1, येळगाव 2, जिंती 4, टेंभू 3, शेणोली 1, कांबळी 1, वडोली भिकेश्वर 2, नारायणवाडी 1,नांदगाव 1, तासवडे 1, वारुंजी फाटा 1, कार्वे 3, म्हावशी 1, केसे 1, पार्ले 2, विंग 1, सावडे 1, साळशिंरबे 1, चरेगाव 2, कोपर्डे हवेली 1, शिरगाव 1, कोले 1,दुशेरे 1,तुळसण 1, कवठे 7, हजारमाची 8, गोळेश्वर 2, कोल्हापूरनाका 1, खुबी 1, बेलवडी 1, कोर्टी 2, बेलवडे बु 1, मसुर 1, राजमाची 1.
सातारा तालुका 254 बाधित
सातारा 43, सोमवार पेठ 5, मंगळवार पेठ 12, शनिवार पेठ 4, बुधवार पेठ 3, गुरुवार पेठ 5, शुक्रवार पेठ 1, सदरबझार 19, करंजे पेठ 4, गोळीबार मैदान 3, शाहुपरी 15, शाहुनगर 6, गोडोली 4, विसावानाका 4, माचीपेठ 2, विकासनगर 6, विलासपूर 1, संभाजीनगर 2, कोडोली 5, संगमनगर 5, कृष्णानगर 1, वाढे 1, जरंडेश्वरनाका 1, वडूथ 1, आरफळ 3, नागेवाडी 3, पोगरवाडी 1, कारंडी 2, काशिळ 1, मालगाव 1, वेचले 1, एमआयडीसी 6, चिंचणी 1, लिंब 1, बेलवडे सोनगाव 1, कोंडवे 2, शिवाजीनगर सातारा 1, अंगापुर 1, तामजाईनगर 1, पंताचा गोट 1, वर्णे 1, खेड 2, गडकरआळी 1, नुने 1, सासपडे 1, सैदापूर 4, भवानी पेठ सातारा 4, मोळाचा ओढा सातारा 1, गेंडामाळ 1, नागठाणे 1, संगममाहुली 2, समर्थ मंदिर 1, व्यंकटपुरा पेठ 2, धावडशी 1, पाटखळ 1, दौलतनगर सातारा 2, चिंपळणुकर बाग सातारा 2, सदाशिव पेठ 1, परळी 1, वनवासवाडी 1, साकुर्डी 1, अपशिंगे 1, प्रतापगंज पेठ 1, काळोशी 2, केसरकर पेठ सातारा 1, कृष्णानगर 1, पार्ले 1, शिवथर 1, सोनगाव 1, किरट 1, खटकेवाडी 1, मल्हारपेठ 1, बोरगांव पोलीस स्टेशन 1, कृष्णानगर 7, समर्थनगर 21.
कोरेगाव तालुका 111 बाधित
कोरेगाव 28, आसरे 1, शिरंबे 2, जरेवाडी 1, झिरपेवाडी 1, धामणेर 5, कटापुर 3, एकंबे 2, आढावळे 1, सातारा रोड 9, जुनी पेठ कोरेगाव 2, राऊतवाडी 2, सोनके 5, शिरढोण 1, सासुर्वे 1, रहिमतपूर 9, घिगेवाडी 1, चौधरवाडी 1, तडवळे 2, तांदुळवाडी 1, साठेवाडी 1, पाडळी 1, चिमणगाव 1, गुगावलेवाडी 2, गोडसेवाडी 1, पिंपोडे 2, वाठार स्टेशन 11, दहिगाव 2, सोळशी 1, करंजखोप 6, आंबवडे 1, चंचली 1, डिस्कळ 2.
फलटण तालुका 67 बाधित
फलटण 5, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, रविवार पेठ 3, भडकमकरनगर 1, खटके वस्ती 3, लक्ष्मीनगर 8, काळुबाईनगर 4, मलटण 9, जिंती नाका 1, कोळकी 2, निरगुडी 6, तरडगाव 1, पाडेगाव 2, साखरवाडी 4, जाधवाडी 1, गुणवरे 2, चव्हाणवाडी 1, विडणी 1, मिरेवाडी 1, मुंजवडी 1, राजाळे 3, तेली गल्ली फलटण 2, धवळेवाडी 1, कसबा पेठ फलटण 1, कुरवली बु. 1.
खटाव तालुका 61 बाधित
विसापुर 12, काळेवाडी 2, वडूज 8, जाखनगाव, मोळ 1, सिद्धेश्वर किरोली 1, कातर खटाव 11, मायणी 1, खातगुण 1, भोसरे 2, वारुड 1, गोरेगांव 6, दालमोडी 1, हिंगणे 2, कलेढोण 1, जायगांव 3, चितळी 3, तडवळे 1, बुध, दरुज 4.
वाई तालुका 55 बाधित
वाई 2, रविवार पेठ 1, मधली आळी वाई 1, सिद्धनाथवाडी 3, वेळे 5, भुईंज 3, किरोली 1, केंजळ 2, शेंदूरजणे 2, कुसेगाव 1, मेणवली 2, पसरणी 2, गंगापुरी 5, धर्मपुरी 1, बावधन नाका 2,कुसगाव 1, वरखडवाडी 1, विरमाडे 1, खनापुर 1, यशवंतनगर 1, ब्रम्हपुरी 1, सोनगिरीवाडी 2, सर्कलवाडी 1, किकली 1, सह्याद्री नगर 8, केव्हीएम 1, बावधन 1, नवेचीवाडी 1, पंदेवाडी 1.
पाटण तालुका 54 बाधित
पाटण 10, मुंद्रुककेळे 1, चाफळ 1, उरुल 3, नवसारी 1, नावडी 3, निसरे 4, नावडी 1, अंबाळे 3, बाबवडे 1, मारुल हवेली 1, मल्हार पेठ 3, गवळीनगर 2, नातोशी 1, मल्हारपेठ 7, गारवडे 6, कुठरे 2, बनपुरी 1, तळमावले 3.
खंडाळा तालुका 59 बाधित
खंडाळा 9, शिरवळ 17, कामवाडी 1, शिंदेवाडी 2, पळशी 2, नायगाव 4, लोणंद 10, कोपर्डे 2, अंधोरी 1, वावकलवाडी 1, भाटघर 3,लोणी 1, पारगांव 2, बावड 2, तळमावले 2.
माण तालुका 17 बाधित
म्हसवड 7, बिदाल 1, वारुडगड 1, रांजणी 3, कुक्कुडवाड 1, मार्डी 2, कुळकजाई 1, इंजबाव 1.
जावली तालुका 17 बाधित
जावळी 1, जवळवाडी 1, मेढा 8, केळघर 2, कुडाळ 3, सोनगाव 1, कुसुंबी 1.
महाबळेश्वर तालुका 45 बाधित
महाबळेश्वर 6, तापोळा 7, पाचगणी 17, तळवडे 1, गुताड 1, अहिर वाणवली 4.
इतर 6 : बाहेरील जिह्यातील इस्लमापूर 3, भवानीनगर जि. सांगली 1, बेलगम 1, साखरआळे जि. सांगली 1, कडेगाव जि. सांगली 1, भोर जि. पुणे 1, शिराळा 1, तडसर ता. कडेगाव 2, खानापूर सांगली 2.
35 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे शिरवळ 63 वर्षीय पुरुष, खिंडवाडी 83 वर्षीय पुरुष, सोनगाव ता. जावळी 55 वर्षीय महिला, आकाशवाणी सातारा 42 वर्षीय पुरुष, कृष्णानगर सातारा 70 वर्षीय महिला, काशिळ 70 वर्षीय पुरुष, कारी 48 वर्षीय महिला, गोडोली सातारा 80 वर्षीय पुरुष, सदरबाजार 35 वर्षीय पुरुष, म्हसवे सातारा 68 वर्षीय पुरुष, एकंबेरोड कोरेगाव 62 वर्षीय पुरुष, घोणशी कराड 65 वर्षीय महिला, पवारनिगडी 60 वर्षीय पुरुष, संगमनगर सातारा 70 वर्षीय पुरुष, सातारा 60 वर्षीय पुरुष, सुभाषनगर सातारा 63 वर्षीय पुरुष, शेंद्रे सातारा 69 वर्षीय पुरुष, पाडळी सातारा 66 वर्षीय पुरुष तसेच विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये शेरे शेणोली ता. कराड 62 वर्षीय पुरुष, निमसोड ता. खटाव 65 वर्षीय महिला, जाखणगाव ता. खटाव 55 वर्षीय महिला, साकुर्डी ता. कराड 65 वर्षीय पुरुष, रविवार पेठ वाई 75 वर्षीय पुरुष, गणपती आळी वाई 82 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 64 वर्षीय महिला, तामजाईनगर सातारा 68 वर्षीय पुरुष, शाहूपुरी सातारा 70 वर्षीय महिला, सैदापुर सातारा 52 वर्षीय महिला, कोरेगाव 88 वर्षीय पुरुष, पळशी ता. खटाव 40 वर्षीय पुरुष, वहागाव कराड 58 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ कराड 82 वर्षीय महिला, खटाव 64 वर्षीय पुरुष, नवेचीवाडी वाई 55 वर्षीय पुरुष, चांदक वाई 84 वर्षीय पुरुष असे एकूण 35 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 55,914
एकूण बाधित 23,949
एकूण मुक्त 14,567
मृत्यू 659
उपचारार्थ रुग्ण 8,723