वृत्तसंस्था / नवी दिल्ली
डेन्मार्कमध्ये 3 ते 11 ऑक्टोंबर दरम्यान होणाऱया थॉमस-उबेर चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारताची महिला बॅडमिंटनपटू मालविका बनसूद सज्ज झाली आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीची आपल्याला अधिक भीती वाटत नसून या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आपण इच्छूक असल्याचे मालविकाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
गेल्या मार्चमध्ये जागतिक स्तरावर कोरोना महामारी संकटाला प्रारंभ झाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व क्रीडा हालचाली ठप्प झाल्या होत्या. बऱयाच महिन्यानंतर आता उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धा डेन्मार्कमध्ये ऑक्टोंबर महिन्यात होत आहेत. या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू दर्जेदार कामगिरी करतील, असा विश्व़ास मालविकाने व्यक्त केला. महिलांच्या उबेर चषक स्पर्धेसाठी भारताचा ड गटात समावेश असून या गटामध्ये चीन, फ्रान्स आणि जर्मनी यांचा सहभाग आहे.









