प्रतिनिधी / शिरोळ
कोरोनाविषाणू च्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक साधारण सभेस 31 मार्च 21 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तर कोल्हापूर सांगली जिल्ह्याबरोबर अन्य जिल्ह्यात असलेल्या बहुराज्य सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक साधारण सभेस 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. हा आदेश नुकताच केंद्र शासनाने संबंधित सहकारी साखर कारखान्यांना दिले आहेत.
राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक साधारण सभा सप्टेंबर महिन्याअखेर घेण्याची परंपरा आहे. परंतु गेल्या सहा महिन्यापासून कोविड 19 या विषाणूने जगभर थैमान मांडले आहे. या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सहकारी संस्थेच्या वार्षिक साधारण सभा घेण्यास शासनाने परवानगी दिलेली नाही.
केंद्र शासनाने बहुराज्य सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक साधारण सभेसाठी 31 डिसेंबर ही मुदत देण्यात आली आहे. तसा आदेश नुकताच संबंधित सहकारी साखर कारखान्यांना देण्यात आल्याने सर्वच साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने पुढे असलेला हा विषय तात्पुरता पुढे ढकलण्यात आला आहे. सहकारी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभा कधी होणार याकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले होते. या निर्णयाने दिलासा मिळाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









