सांखळी/प्रतिनिधी
गोव्यात खाण बंदीमुळे समस्या ग्रस्तना सरकारने दिलासा द्यावा तसेंच मुख्यमंत्र्यांनी निदान आपल्या मतदारसंघातिल खाण अवलंबिता च्या समस्या जाणून घ्याव्यात अशी अपेक्षा ट्रकमालक संघटना करताना दिसत आहे खाण विषय न्यायालयात जरीअसला तरी तेथे फक्त तारखा मिळत आहे तेव्हा सरकारने आपली भूमिका स्पष्ट करून लवकरच राज्यातील खाणी सुरू कराव्यातअशी अपेक्षा सांखळीत ट्रक मालक करत आहेत या विषयावर सांखळीत ट्रक मालकात भाजप गट कॉग्रेस गट झाल्याचे स्पष्ट दिसत असले तरी सरकारने सर्वांसाठी कार्यरत असल्याचे ही समजते काही दिवसांपासून सांखळी मतदारसंघात खनिज विषयावर बरीच चर्चा रंगत आहे मात्र ग्रामिण भागातील नेमकी परिस्थिती काय, त्याच्या समस्या काय, नेमका फायदा कोणाला या विषयावर सविस्तर माहिती आज तरुण भारत प्रतिनिधी ने जाणून घेतल्या
गैरेंज मालक, सुटेभाग विपेताना मोठे नुकसान
राज्यातील खाण व्यवसाय बंद झाल्या पासून ट्रक मालकांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहे आधिच बॅ?केत कर्ज बाजारी झालेल्या मालकांनी गैरेंज मालक ,आणि सुटेभाग विक्री करणाऱयांनाही अडचणीत टाकल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे यांची ही रोजीरोटी धोक्मयात आल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहे तसेच गाडी धुवून पोट भरणार गरीब मंजूरही बेकार झाला आहे या माणसांना कोणाचेच सहकार्य मिळत नसल्याने ट्रक मालकां बरोबरच आमचाही विचार व्हायला हवा असे मत सुटेभाग विपेते प्रशांत केरकर वेळगे यांनी सांगितले तसेच ट्रकच्या धंद्यात मोठं यश नाही खाण कंपन्या हमाला सारख काम करून घेत होतें या धंद्यातू बाहेर पडलेले आज सुखी आहे असे ही ते या विषयावर बोलताना म्हणाले
सरकारचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक:गणेश घाडी
राज्यात तसेच सांखळीमतदारसंघात खनिज वाहतूक सरकारने सुरू केल्याने त्याचा फायदा येथील ट्रक मालकांना झाला यामुळे ग्रेरेंजमालक, सुटेभाग विपेते, टायर दुरुस्ती करणारे इत्यादी अनेकांना त्याचा फायदा झाला त्यामुळे सरकार अभिनंदनास पात्र ठरत आहे म्हणून या पुढेही खनिज वाहतूक सुरू होईल या अपेक्षेने सरकारच्या विश्वास वर अनेकांनी ट्रक दूरस्थ करून ठेवले आहेत तसेच या पूर्वी आम्हाला सरकारने सहकार्य दिले आहे आताही सरकार कडून अपेक्षा आहे पण कोरोनामहामारीचे संकट लक्षात घेऊन सारकरच्याही समस्या प्रत्येकाने जाणून घेण्याची गरज आहे तसेच ट्रक विकणे हा पर्याय नाही आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहा यश नक्की मिळेल आणि नाहक कोणत्याही अफवांवर विश्वस्त ठेऊ नका असे मत गणेश घाडी या ट्रक मालकाने व्यक्त केले
सरकारने सांखळीत नवीन पर्याय शोधावेत : प्रताप गावस संपूर्ण सांखळी मतदारसंघात खाण बंदी मुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत राज्यांची आर्थिक स्थिती बरोबर नाही, कोरोना महामारीचे संकट, बेकारीत वाढ झाल्याने खाण व्यवसाय लवकरात लवकर सुरू करावा अशी अपेक्षा खाण संबंधित नागरिक करत आहे त्यात अनेकजण कर्ज बाजरी झाल्याने कर्जे फेडणे ही कठीण झाले आहे भाजपने खाणी बंद केल्या त्या गेली आठ वर्ष झाली त्यांना चालू करणे त् शक्मय झाले नाही सांखळी मतदारसंघात ग्रामीण भागात बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकारने नवीन पर्याय शोधून काढावेत जाणे करून बेकार युववर्गास कामधंदा प्राप्त होईल काहींना पेकेज दिले म्हणून सर्व ट्रक मालकांच्या समस्या सुटत नसतात हे सरकारने लक्ष्यात घेणे आवश्यक आहे कायद्याच्या चोवकटी राहून लवकरात खाणी सुरू करा जाणे करून ट्रक मालकांच्या अनेक समस्या सुटू शकणार असे मत माजी आमदार प्रताप गावस यांनी व्यक्त केले
खाण घोटाळय़ातील पैसे रिकव्हर करा: धर्मेश सगलानी
राज्यात30हजार कोटी रुपयांचा झाल्याचे सांगू शेवटी 3 हजार रुपयांवर आडणाऱया भाजप सरकारने ते पॅसें रिकव्हर करून खाण अवलंबिताना द्यावे जेणे करून अशा लोकांच्या घरात चूल पेटेल, कोणी आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकेल शेती, बागायती चे नुकसान झाले त्यांना द्या जाणे करून त्याचा उपयोग होईल ट्रक मालकांना पेंकेज देऊन सरकारने कोणतेही उपकार केले नाही ते नागरिकांचे पैसे आहेत पर्रिकर यांनी खाणी बंद करून आज8वर्षे झाली तरीही सरकार निवडणुका जवळपास आल्या की खाणी सुरू करण्याचे आश्वासन देते सरकारने खाणी सुरू करण्यसाठी न्यायालयाने दिलेल्या दोन्ही पर्यायांचा विचार करावा तसेच राज्यात खाण परिसरात महिना6 हजार बेकारी भत्ता द्यावा असे मत सांखळी पालिका नगरसेवक धर्मेश सगलानी यांनी या विषयावर बोलताना व्यक्त केले









