बीजिंग
चीनने कोविड-19 शी लढण्यासाठी आपल्या पहिल्या ‘नेजल स्प्रे वॅक्सीन’च्या चाचणीला मंजुरी दिली आहे. या वॅक्सीनच्या पहिल्या टप्प्याची चाचणी नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्मयता आहे. ही वैद्यकीय चाचणी शंभर लोकांवर करण्यात येईल. चीनमधून पसरलेल्या या जागतिक महामारीने आतापर्यंत जगभरात नऊ लाखांपेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे. नॅशनल मेडिकल प्रॉडक्ट्स अŸडमिनिस्ट्रेशनकडूनही चाचणीला मंजुरी मिळाली आहे.
हाँगकाँग युनिव्हर्सिटी आणि बीजिंग येथील वानतायी बायोलॉजिकल फार्मसीच्या संशोधकांनी ही लस विकसित केली आहे. हाँगकाँग युनिव्हर्सिटीचे मायक्रोबायोलॉजिस्ट युवेन क्मयोंग व्योंग यांनी सांगितले की, नाकातून देण्यात येणाऱया या वॅक्सीनद्वारे दुहेरी सुरक्षा मिळते. ही एन1एच1 सारख्या फ्लूसह कोरोना व्हायरसला सुद्धा निषक्रिय करते. त्यांनी हे सुद्धा मान्य केले की, या वॅक्सीनचे साईड इफेक्ट म्हणून दमा आणि धाप लागण्याची समस्या होऊ शकते.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांचे म्हणणे आहे की, ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि औषध कंपनी ऐस्ट्राजेनेकाद्वारे विकसित कोरोना वॅक्सीनची चाचणी थांबल्याने एजन्सीला जास्त चिंता नाही. ऑक्सफोर्ड वॅक्सीनच्या चाचणीत आलेल्या अडथळय़ाने जगाला हे समजण्याची संधी दिली आहे की, संशोधनात चढ-उतार येत असतात. लस लोकांना रोगापासून वाचवण्यात सक्षम आहे किंवा नाही यासाठी लाखो चाचण्या करण्याची गरज आहे.









