प्रविण काळबर यांनी जपली सामाजिक बांधिलकी
प्रतिनिधी / कागल
कोरोना काळात कागल मधील रुग्णांची रुग्णवाहिके अभावी होणारी हेळसांड होत होती. त्याला पर्याय म्हणून नगरसेवक प्रविण काळबर यांनी सामाजिक बांधिलकी जपताना आपली मुलगी समृद्धी काळबर हिचा वाढदिवस साजरा न करता त्याऐवजी कोरोना रुग्णांसाठी समर्थ कन्स्ट्रक्शन तर्फे मोफत रुग्णवाहिका प्रदान केली. त्यामुळे कागल मधील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना कोविड सेंटरला जाणे व घरी परत येणे सोईस्कर होणार आहे .
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचा शुभारंभ करण्यात आला. कागल येथे नवीन कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे . याठिकाणी ही रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली .
या प्रसंगी प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









