प्रतिनिधी / करमाळा
करमाळा शहर व तालुक्यात आज (ता.११) एकूण १८१ रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ४२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, करमाळा तालुक्यात यात २८ पुरुष तर १४ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरा व तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असलेली पहायला मिळाली आहे. आज करमाळा शहरात १०५ रॅपिड टेस्टमध्ये २३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात ७६ रॅपिड टेस्टमध्ये १८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज ३९ जणांना डिस्चार्ज दिला असून आजपर्यंत ७१७ कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून घरी सोडले आहे. सध्या ४५६ जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११९५ वर जावून पोहोचली आहे.
करमाळा शहरातील २३ कोरोनाबाधीत
किल्ला विभाग १ महिला ,एस.टी.कॉलनी १ पुरुष, खडकपुरा २ पुरुष, २ महिला ,कानाडगल्ली २ पुरुष, १ महिला कुंकू गल्ली २ पुरुष, १ महिला, शिवाजीनगर १ पुरुष, ५ महिला, मारवाडगल्ली १, महिला डवरी गल्ली २ पुरुष, मेनरोड १ पुरुष राशीन पेठ १ पुरुष
ग्रामीण भागातील १८ कोरोनाबाधीत
रावगाव १ पुरुष, १ महिला, झरे २ पुरुष ,वीट १ पुरुष, उमरड १ पुरुष, शेलगाव २ पुरुष, १ महिला घोटी १ पुरुष, सरपडोह १ पुरुष ,देवळाली २ पुरुष, वांगी १ पुरुष, शेटफळ १ पुरुष, जिंती १ महिला ,पाडळी २ पुरुष .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









