बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर राजधानी बेंगळूरमध्येही कोरोना बाधितांची वाढ होत आहे. गुरुवारी बेंगळूरमध्ये फक्त एकट्या राजधानी शहरात ३,१६१ नवीन प्रकरणे नोंदविली गेली, तर गुरुवारी कर्नाटकात ९२१७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, १९८ प्रभागांचा समावेश असलेल्या शहरात सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या १९,६८० वर पोहचली आहे.
आरोग्य विभागाने गुरुवारी बेंगळूरमध्ये ३३जणांचा मृत्यू झाल्याचे म्हंटले आहे. यासह, शहरात एकूण २,३४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.