प्रतिनिधी/वाई
वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस शेतकर्यांची गर्दी वाढत आहे. यातच कोरोना रुग्णांची वाढती काही केल्या कमी होत नाही. ही वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी येत्या शनिवार आणि रविवारी वाई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय सर्व संचालक अधिकारी आणी कर्मचार्यांनी घेतला असल्याची माहिती सभापती लक्ष्मणराव पिसाळ यांनी दिली.
यावेळी बोलताना पिसाळ म्हणाले, गेल्या दोन महिन्यापासून कोरोनो महामारीने वाई शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावात धुमाकुळ घालण्यास सुरवात केली. आज अखेर तालुक्यात २ हजार कोरोनो बाधित रुग्ण आढळले आहेत तर ३८ रुग्णांना उपचारा दरम्यान आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी वाईचे महसूल, पोलीस, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रे हे सर्व प्रशासनातील अधिकारी एकत्रीत येऊन हा फैलाव रोखण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहेत.
यातच बाजार समिती मध्ये दररोज पहाटे आणी सायंकाळी शेतकरी आपला तरकारी भाजीपाला विक्री साठी आणतात. हा माल खरेदी साठी रायगड जिल्ह्यातील महाड रोहा अलिबाग पोलादपुर खेड इंदापुर चिपळूण या भागातील मोठ मोठे व्यापारी शेकडोच्या संख्येने येतात. त्यामुळे बाजार समिती मध्ये नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यातून कोरोनो रोगाला आमंत्रण मिळु नये याची खबरदारी घेण्यासाठी वाई कृषी उत्पन्न बाजार समिती स्वयम स्फृर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









