ऑनलाईन टीम / कैरो :
इजिप्तमध्ये ममींच्या अंदाजे 2500 वर्षांपूर्वीच्या 13 शवपेट्या आढळून आल्या आहेत. इजिप्तच्या पर्यटन व दुर्मीळ वस्तू मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
इजिप्तच्या वाळवंटातील सक्कारा येथे उत्खनन करताना पुरातत्त्व संशोधकांना या शवपेट्या आढळल्या. जमिनीत 40 फूट खोलवर एकावर एक अशा तेरा शवपेट्या पुरण्यात आल्या होत्या. या शवपेट्या लाकडी आहेत. त्यावर नक्षीकाम करून ते लाल, काळ्या, पांढऱ्या, निळ्या आणि सोनेरी रंगाने रंगविण्यात आले आहे.
या 13 शवपेट्यांमध्ये नेमके कोणाला ठेवले होते याबाबतची माहिती मिळू शकली नाही. ममी असल्यामुळे या पेट्या अद्याप पूर्णपणे उघडून पाहण्यात आल्या नाहीत, असेही इजिप्तच्या पर्यटन व दुर्मीळ वस्तू मंत्रालयाने म्हटले आहे.









