प्रतिनिधी / करमाळा
करमाळा शहर व तालुक्यात आज एकूण २६६ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये तब्बल ६८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून करमाळा तालुक्यात यात ४१ पुरुष तर २७ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरा व तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असलेली पहायला मिळाली आहे. आज करमाळा शहरात १५४ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ३० जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात २६६ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ३८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज ३२ जणांना डिस्चार्ज दिला असून आजपर्यंत ६७० कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून घरी सोडले आहे. सध्या ४५३ जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११५३ वर जावून पोहोचली आहे.
करमाळा शहरातील ३० जण कोरोनाबाधित
शाहूनगर १ पुरुष, १ महिला, किल्ला ३ पुरुष, ५ महिला, नागोबा मंदिर १ महिला ,मुथानगर १ पुरुष ,सुमंतनगर २ पुरुष, २ महिला गणेश नगर २ महिला ,शिवाजीनगर २ पुरुष, १ महिला मंगळवारपेठ २ पुरुष, राशीन पेठ १ महिला, कुंकूगल्ली १ महिला, रंभापूरा १ पुरुष, सारंगकर हॉस्पिटल १ महिला, सहकारनगर १ पुरुष ,करमाळा पोलीसठाणे १ पुरुष
ग्रामीण भागातील ३८ कोरोनाबाधीत
करंजे १ पुरुष उमरड २ पुरुष, १ महिला वंजारवाडी १ पुरुष, २ महिला, जेऊर ५ पुरुष, वाशिंबे १ पुरुष रावगाव १ पुरुष ,राखवाडी १ पुरुष झरे १ पुरुष ,गुलमोहोरवाडी १ पुरुष ,उंदरगाव १ पुरुष, देवळाली ४ पुरुष २ महिला ,वीट ४ पुरुष, ३ महिला , केम ४ पुरुष, ३ महिला
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









