ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात आता पर्यंतची सर्वाधिक म्हणजेच 95 हजार 735 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1,172 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 44 लाख 65 हजार 864 वर पोहचली असून, मृतांची संख्या 75 हजार 062 एवढी आहे.

सध्या देशात 9 लाख 19 हजार 018 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 34 लाख 71 हजार 784 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आतापर्यंत देशात 5 कोटी 29 लाख 34 हजार 433 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 11 लाख 29 हजार 756 रुग्णांची तपासणी बुधवारी एका दिवसात करण्यात आली.









