पंचगंगा घाटावर गुरूवारी वन विभाग घेणार शोध
प्रतिनिधी / कोल्हापूर
पंचगंगा नदीत बुधवारी सकाळी मगरीचे दर्शन घडले आहे. नदीच्या पलिकडील बाजूला मगर दिसल्याने याची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे. नदीत पोहणाऱयांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पंचगंगा विहार मंडळाने केले आहे. गुरूवारी महापालिका अग्निशमन दल आणि वन विभागाकडून नदीपात्रात मगरीचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
पंचगंगा नदीत यापुर्वी दोनदा मगरीचे दर्शन घडले होते, या दोन्ही मगरी वन विभाग, अग्निशमन दलाने पकडल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांपुर्वी राजाराम बंधाऱयावर रात्री मगर दिसून आली होती. दरम्यान, बुधवारी सकाळी पचंगगा घाटाच्या पलीकडे वडणगे बाजूला मगर दिसून आली. त्यानंतर पंचगंगा विहार मंडळाने याची माहिती महापालिकेसह वन विभागाला दिली आहे. गुरूवारी या मगरीचा शोध पंचगंगा नदीपात्रात घेतला जाणार असल्याचे समजते.