निफ्टी 11,350 अंकांच्या खाली : जागतिक संकेताचा प्रभाव
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी कमकुवत संकेतामुळे आणि बाजारातील भारती एअरटेल, ऍक्सिस बँक आणि एचडीएफसीचे समभाग घसरल्याने मुंबईचा सेन्सेक्स बाजार घसरणीसह बंद झाला आहे. प्रमुख कंपन्यांच्या घसरणीमुळे सेन्सेक्स दिवसअखेर 51.88 अंकांनी घसरुन निर्देशांक 38,365.35 वर बंद झाला तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 37.70 अंकांनी घसरल्याने निर्देशांक 11,317.35 वर बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिवसभरातील क्यवहारादरम्यान सेन्सेक्स 471.03 अंकांवर खाली वर होत अंतिम क्षणी बंद झाला आहे. मुख्य कंपन्यांमध्ये टाटा स्टीलचे समभाग चार टक्क्मयांनी नुकसानीत राहिले आहेत. तर भारती एअरटेल, ऍक्सिस बँक, ओएनजीसी, स्टेट बँक आणि सन फार्माचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
दुसऱया बाजूला मात्र एचसीएल टेक, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा आणि टीसीएसचे समभाग लाभात राहिले आहेत. दिवसभरात जवळपास सर्वाधिक वेळ स्थानिक कंपन्यांचे समभाग भारतीय बाजारात लाभात राहिले होते. परंतु व्यवहाराच्या अंतिम काही तास युरोपीय बाजारातील घसरणीच्या बातमीमुळे स्थानिक बाजाराने तेजी गमावली आहे. कारण स्थानिक बाजारात विक्रीच्या दबावामुळे प्रमुख निर्देशांक गडगडल्याची नोंद करण्यात आली आहे.
जागतिक पातळीवरील शेअर बाजारात चीनचा शांघाय कम्पोजिट, हाँगकाँग, दक्षिण कोरियाचा कॉस्पी व जपानचा निक्की हे नफ्यासह बंद झाले आहेत. तर जागतिक बेंचमार्क बेंट कच्चे तेलाचा दर 41.30 डॉलर प्रति बॅरेलवर आला आहे.









