बेंगळूर/प्रतिनिधी
सेंट्रल क्राइम ब्रँच (सीसीबी) पोलिसांनी मंगळवारी ड्रग्स प्रकरणी अटक केलेल्या वीरेन घरातून बनावट पोलीस गणवेश जप्त केला आहे.
सीसीबी पोलिसांनी मंगळवारी ४ सप्टेंबर रोजी दिल्लीहून सीसीबी पोलिसांनी अटक केलेल्या वीरन खन्ना यांच्या घरावर छापा टाकला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेन खन्ना याने अशा पार्ट्या आयोजित केल्या जिथे ड्रग्सचे सेवन केले जात होते. तत्पूर्वी बेंगळूर गुन्हे शाखेचे सहआयुक्त संदीप पाटील यांनी कोर्टाकडून घेतलेल्या सर्च वॉरंट वरून विरेन खन्नाच्या घरी शोध घेण्यात आला असल्याचे म्हंटले आहे.
वीरेन खन्नाच्या घरामध्ये झडती घेतली असता यावेळी एक बनावट गणवेश, बेल्ट, कॅप, शूज आढळला, पण तिथे स्टार आढळले नाहीत असेही संदीप पाटील यांनी सांगितले. सीसीबी पोलिसांनीही पार्टीमध्ये खन्नाचा बनावट पोलीस गणवेश परिधान केलेला फोटो शेअर केला होता.









