शिवाजीराव जगताप / सातारा
वाई शहरात वाढते कोरोनाचे रुग्ण पाहून वाईतील व्यापाऱ्यांनी वाईमध्ये जनता कर्फ्युची हाक दिली होती.त्यानुसार वाई शहरातील व्यापारी वर्ग, नागरिक यांनी स्वयंम स्फूर्तीने या जनता कर्फ्यूत सहभाग नोंदवला. सतत गजबजलेली मंडई, किसन वीर चौक, चित्रा टॉकी परिसर, धर्मपुरी, ब्राह्मणपुरी येथील नागरिकांनी शुकशुकाट जाणवत होता.
वाईचे पोलीस चौकात उभे राहून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करत होते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा जनता कर्फ्यू लागू करण्यात आल्याने व्यापारी आणि नागरीकांचे पोलिसांनी आभार मानले.









